बचत गटांसाठी रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी, २६४ कोटींचे वितरण
स्वयंसहाय्यता गटांसाठी राष्ट्रीयकृत बँकांद्वारे कर्जपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने स्वीकारले आहे. आजीवेकेसाठी तसेच सदस्यांच्या वैयक्तिक कामासाठी या कर्जाचा उपयोग करण्यात येत आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात २६४ कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या कर्जवाटपापेक्षा २५ टक्क्याहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. निवडणूक वर्षापूर्वी हे भरभक्कम कर्जवाटप झाले आहे.केंद्र व राज्यसरकारने मिळून स्वयंसहाय्यता समुहाला कर्ज पुरविण्याविषयी निर्णय घेतला आहे. या कर्जातून सामाजिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रक्कम खर्च करण्याात येते. घर बांधणे, शौचालय बांधणे, वैयक्तिक सदस्यांच्याा पोटापाण्याच्या व्यवसायासाठी ही कर्ज रक्कम वितरित केली जात आहे. www.konkantoday.com