
देवगडमध्ये २४ मे पासून ‘गाबीत महोत्सव’
अखिल भारतीय गाबीत समाज, गाबीत समाज महाराष्ट्र, गाबीत समाज सिंधुदुर्ग व गाबीत समाज देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा ‘गाबीत शिमगोत्सव व गाबीत महोत्सव’ येत्या २४ ते २६ मे या कालावधीत देवगडमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी दिली.गुरूवारी बैठक घेऊन त्यामध्ये आयोजन समिती व सांस्कृतिक समिती नेमली जाईल, असेही बैठकीत ठरवण्यात आले. गाबीत समाजाच्या झालेल्या बैठकीनंतर माहिती देण्यात आली आहे. बैठकीवेळी मंचावर डोंबिवली अध्यक्ष धर्माजी पराडकर, देवगड तालुकाध्यक्ष संजय पराडकर, अखिल भारतीय कार्याध्यक्ष दिगंबर गांवकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, महाराष्ट्र गाबीत समाज अध्यक्ष सुजय धुरत उपस्थित होते. बैठकीस देवगड तालुक्यातील विविध गावातील शिमगोत्सव प्रमुख तसेच गाबीत समाज कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, महाराष्ट्र सरचिटणीस बाळा मणचेकर, तालुका सचिव संजय बांदेकर, लक्ष्मण तारी, बाळा मुणगेकर, रमेश तारी, धर्मराज जोशी, डी. बी. कोयंडे, प्रवीण सारंग आदी पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील आडबंदर, मोर्वे, तांबळडेग, मिठमुंबरीं, बागबाडी, किल्ला, आनंदवाडी, मळई, कालवी, कट्टा, टेंबवली, तळवडे, विजयदुर्ग, गिर्ये, आंबेरी, मोंड, वानिवडे, मणचे, विरवाडी भागात शिमगोत्सव मांडाना २ दिवस भेटी देऊन त्यांच्याकडून पुर्वांपार चालत आलेल्या घुमट वादन, रोंबाट, फाग आदी लोककलांची माहिती संकलित केली असल्याची माहिती चंद्रशेखर उपरकर यांनी दिली. या सर्व वाड्यातील समुहांना बोलावून गाबीत महोत्सवात एकत्रित शिमगोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. त्यासाठी आवश्यक परवानग्या घेऊन बंदिस्त सभागृहात तीन दिवसांचा गाबीत महोत्सव साजरा करण्यात येईल.www.konkantoday.com