डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे केलेली शिष्टाई फारशी यशस्वी नाही?
सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करणारे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी काँग्रेसश्रेष्ठींकडे केलेली शिष्टाई फारशी यशस्वी झालेली नाही.याबाबत प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस प्रभारींशी चर्चा करावी, असे सांगून काँग्रेस अध्यक्षांनीच यातून अंग काढून घेतले आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगली हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला आहे.या मतदारसंघात ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मात्र हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याने तो आपल्याकडेच राहावा असा आग्रह धरला होता. यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीत येऊन त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या मतदारसंघात काँग्रेसचे संघटन कसे मजबूत आहे? हे पटवून देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. परंतु काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.श्रद्धा व सबुरी ठेवा असे डॉ. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांना सांगण्यात आले होते. या दोन्ही नेत्यांनी पुन्हा शुक्रवारी दिल्लीमध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खासदार के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती.www konkantoday.com