
कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी उद्यापासून धावणार उधना-मंगळूर स्पेशल
उन्हाळी सुट्टी हंगामात कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ७ एप्रिल ते ६ जून या कालावधीत उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशल चालविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यात स्पेशल ३६ फेर्यांचा समावेश असुन वसई मार्गे धावणार्या स्पेशलमुळे चाकरमान्यांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. या गाडीचे आरक्षणही खुले करण्यात आले आहे.शिमगोत्सवात पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने कोकण मार्गावर आठवड्यातून दोनवेळा चालविण्यात आलेल्या उधना-मंगळूर स्पेशलला चाकरमान्यांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. www.konkantoday.com




