
एसटी कर्मचाऱ्यांना शुद्ध गारेगार पाणी उपलब्ध होणार
एसटी कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाच्या विविध विभागीय कार्यालयाने इनबिल्ट वॉटर कुलर व प्युरिफायरची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाशुद्ध गारेगार पाणी उपलब्ध होणार आहेएका खाजगी कंपनीकडून इनबिल्ट वॉटर कुलर व प्युरिफायरचा खरेदी करण्यात येणार आहेत. इनबिल्ट वॉटर कुलर व प्युरिफायर स्थापितीकरणाची ठिकाणे व पत्ता हा विभागांमार्फत मागविण्यात आला होता, सर्व विभागांमार्फत वॉटर कुलरच्या स्थापितीकरणाविषयीची ठिकाणे ही प्राप्त झाली पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.मशिन स्थापितीकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी म्हणजेच आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता (चा) यांनी जागा निश्चित करणे आवश्यक आहे.ही मशिन प्राधान्याने चालक वाहक व यांत्रिकी कर्मचारी यांच्या विश्श्रांतीगृहात स्थापित केली जाणार आहे. या कामासाठी आवश्यक खर्च करण्याचे अधिकार विभाग नियंत्रक यांना असून त्यांनी त्यांच्या अधिकारात सदरचा खर्च केला जाणार आहे.www.konkantoday.com