उध्दव ठाकरेंची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर बोलण्याची पात्रता तरी आहे काय?-केंद्रीय मंत्री नारायण राणे
सत्तेसाठी ज्यांनी शरद पवारांना शरण जात हिंदूत्व गहाण ठेवले, कोरोना काळात सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत औषधांमध्ये भ्रष्टाचार केला त्या उध्दव ठाकरेंची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर बोलण्याची पात्रता तरी आहे काय?असा खडा सवाल उपस्थित करून ४ जून नंतर कोण तडीपार आणि कोण जेलमध्ये असेल हे कळेल असा गर्भीत ईशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.तर जाहिरनाम्यात बेरोजगारांना एक लाख रूपये मानधन देण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधीचा समाचार घेताना यापुर्वी सत्ता उपभोगलात तेव्हा जमले नाही ते आत्ता तुंम्ही काय करणार? असा टोला लगावत या जाहिरनाम्याची आपण भविष्यात चांगलीच चिरफाड करणार असल्याचे ना. राणे यांनी सांगितले.अब की बार ४००.. पार आणि फिर एक बार मोदी सरकार.. ही घोषणा सत्यात उतरविण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून आपला हक्काचा खासदार निवडून देण्यासाठी आत्तापासून कामाला लागा, खासदार आणि खासदाराचा रूबाब कसा असतो, मंत्रीपदाचा दरारा काय असतो ते मी तुंम्हाला दाखवून देईन आणि रत्नागिरी जिल्हयाचा विकासाचा बॅकलॉग आपण भरून काढू असा विश्वास ना. राणे यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिलाwww.konkantoday.com