
दहीहंडीचा सराव करून घरी परत जाणाऱ्या दोन मित्रांचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मृत्यू मुंबईतील प्रकार
*भरधाव वेगाने चालवत असलेल्या कारचा अपघात होऊन दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दहीहंडीचा सराव करून घरी परत जाणाऱ्या हे दोघे घरी जाऊच शकले नाहीत. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात झाला आणि त्या दोन्ही मित्रांनी सोबतच अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ राजेश ढगे (23) आणि रोहित भाऊसाहेब निकम (29) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी सिद्धार्थ ढगे याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने व बेदरकारपणे वाहन चालवून स्वतःसह मित्र निकम याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ ढगे आणि रोहित निकम हे विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगरमधील रहिवासी असून, सिद्धार्थ हा स्वयंभू हनुमान नगर येथील चाळीत आई व बहिणीसोबत राहात होता. तो नगरातील गोविंदापथकातून दहीहंडीची तयारी करत होता. बुधवारी रात्रीदेखील दहीहंडीचा सराव केल्यानंतर आईने जेवायला बोलावले म्हणून तो घरी निघाला. 10 मिनिचांत घरी जेवायला येतो, असे त्याने आईला फोनवरून सांगितलं. मात्र त्याचवेळी सिद्धार्थला रोहित निकमचा कॉल आल्याने तो त्याच्यासह कारने घराच्या दिशेने गेला. तेव्हा निकमसह आणखी मित्र कारमध्ये होते.ते सर्व मित्र वाटेत उतरल्यानंतर सिद्धार्थ ढगे याने कार चालवायला घेतली आणि तो रोहितला घेऊन भरधाव वेगाने कार चालवत पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्व्हिस रोडने विक्रोळी स्टेशनच्या दिशेने निघाला. मात्र एका ब्रिजला कट मारण्याच्या नादात त्याचेकारवरील नियंत्रण सुटले आणि कार एका झाडाला जाऊन आदळली. ही धटक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि सिद्धार्थ व रोहित दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र त्यांना तेथे दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.