
1 एप्रिलपासून खासगी डॉक्टरानी जिल्हा रुग्णालयात येऊन सेवा देण्याचे बंद केल्याने रुग्णांचे हाल
_रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गेली अनेक वर्षे फिजीशियन उपलब्ध नाहीत. 31 मार्चपर्यंत पॅनलवरच्या खासगी डॉक्टरांना बोलावून रुग्णांवर उपचार केले जात होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून खासगी डॉक्टरांचे एक पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलवरचे डॉक्टर जसे उपलब्ध होतील, तसे त्या डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयात पाचारण केले जात होते. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये भूलतज्ज्ञही उपलब्ध नाहीत.दोन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर असले तरी एका डॉक्टरची बदली झालेली आहे. लहान मुलांचेही डॉक्टर उपलब्ध नसून सध्या मानधनावरील डॉक्टर लहान मुलांवर उपचार करत आहेत. हाडांचे डॉक्टर उपलब्ध नसून मानधनावरील डॉक्टर येऊन सेवा बजावत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात यापूर्वी एनआरएचएममधून खासगी डॉक्टरांच्या पॅनलवरील डॉक्टरांना बोलावून रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यांचे मानधन एनआरएचएममधून दिले जायचे. परंतु जिल्हा शासकीय रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एनआरएचएममधून खासगी डॉक्टरांना बोलावू शकत नाही. त्यामुळे 1 एप्रिलपासून खासगी डॉक्टर जिल्हा रुग्णालयात येऊन सेवा देण्याचे बंद झाले आहेत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची चिंता वाढली आहे. आता डॉक्टर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आहे. ते आता कुठून डॉक्टर उपलब्ध करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com