विशाल पाटील यांचं विमान गुजरातच्या दिशेने जात आहे-खासदार संजय राऊत
सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. पण सांगली हा आमचा गड आहे, इथे आमचाच उमेदवार द्या, अशी भूमिका सांगली जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे.विशाल पाटील हे सांगलीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीत आहेत. तिथे पक्षातील वरिष्ठांशी सांगलीच्या जागेवर चर्चा करत आहेत. काँग्रेसकडून वारंवार सांगलीच्या जागेवर दावा केला जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे.सांगलीच्या जागेवरून राऊत काय म्हणाले?विशाल पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. विश्वजीत कदम हे पायलट आहेत, हे विशाल पाटील यांनी वक्तव्य 10 मार्च रोजी बुरली येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. विशाल पाटील यांचे कोणी तर पायलट आहेत. पायलट नेईल तिथे ते जात आहेत. विशाल पाटील यांचं विमान गुजरातच्या दिशेने जात आहे. आता विमान गुजरातला उतरू शकतं. विशाल पाटील नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार आहेत? असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.www.konkantoday.com