रत्नागिरी शहराप्रमाणेच चिपळूण शहराचे भुयारी गटार योजना कागदावरच

_रत्नागिरी शहरातील भुयारी गटाराची योजना कागदपत्रावर असतानाच चिपळूण शहरात देखील ही स्थिती असल्याचे दिसत आहेचिपळूण शहरात २००६ साली भुयारी गटार योजना साकारण्याचा मुद्दा तत्कालीन सत्तादार्‍यांनी सर्वांसमोर ठेवला. त्यासाठी आर्किटेक्ट कंपनी नेमण्यात आली. मात्र या कंपनीने शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ही योजना साकारणे शक्य नसल्याचे आपल्या अहवालात नमूद केले. त्ययात बरीच कारणे देण्यात आली होती. त्यामुळे सर्वांनीच या योजनेचे विचार सोडून दिला. त्यानंतर २०१६ साली पुन्हा भुयारी गटार योजनेने उचल घेतली. तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी ही योजना पुढे आणली. त्याला बहुतांशी नगरसेवक व प्रशासनाने होकार दिला मात्र हे करताना मागील प्रकल्प अहवालाचा अभ्यास करण्यात आला नाही.या योजनेचा नव्याने प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याची जबाबदारी संदीप गुरव ऍण्ड असोसिएटसवर होती. या कंपनीने या योजनेसाठी ९८ कोटी ८० लाख रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला. यापोटी कंपनीला नगर परिषदेने १ कोटी १८ लाख ५६ हजार रुपये मोजले आहेत. हा विषयही त्यावेळी चांगलाच गाजला होता. भुयारी गटार योजना येथे होणे अशक्य असतानाही त्यावर इतका खर्च कशाला व नगराध्यक्षांनी अशी काय परिस्थिती उदभवली की  यासाठी ५८/२ या विशेष अधिकाराचा वापर केला. अशी तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी काही सूचना केयानंतर निविदा प्रक्रिया राबवून हे काम वरील कंपनीला देवून त्यांच्या बिलाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आला होता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button