रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर सर्कल येथील आंब्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर सर्कल येथील आंब्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास दोन दुचाकी या रस्त्यावर पडलेल्या स्थितीत दिसून आल्या होत्या. या गाड्यांचे आरसे फुटले असून किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले आहे. दरम्यान या प्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले.मारूती मंदिर येथील आंब्याच्या झाडाखाली चारचाकी तसेच दुचाकींची पार्किंग करण्यात येत असते. तसेच या ठिकाणी वाहतूक पोलीसही असतात. वाहनांची तोडफोड झाली असल्यास ती कुणी केली असा प्रश्न उपस्थित होतो. बुधवारी रात्रीच्या सुमारास चार दुचाकी उभ्या होत्या. त्यापैकी नेमक्या दोनच दुचाकी विरूद्ध दिशेला पडलेल्या होत्या. आंब्याच्या झाडाखाली नगर परिषदेचा कचरा डबाही ठेवण्यात येत असतो. त्यामुळे गुरांची धडक लागून ही वाहने पडली असावीत, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.www.konkantoday.com