यावर्षी चिपळूण तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या टंचाईग्रस्त वाड्याची संख्या २५ वर
यावर्षी चिपळूण तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून सध्या ९ गावातील १३ वाड्यांमध्ये दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. प्रत्यक्षात १६ गावांमधील २५ हून अधिक वाड्यांमध्ये टंचाई जाणवू लागली असली तरी टँकर उपलब्ध होत नसल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य होवून बसले आहे. पाण्यासाठी टँकरच्याच टंचाईमुळे सर्वत्र बोंबाबोंग सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.आटत चालेले पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत तसेच तिवरे, डेरवण, कळवंडे येथील धरणे नादूरस्त झाल्याने भविष्यात टंचाईग्रस्त गाव व वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेवून यावर्षीचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला. गतवर्षी तालुक्यातील अडरे, कामथे खुर्द, कोसबी, नारदखेरकी, रिक्टोली, कळकवणे, कळंबट, नांदगाव खुर्द, तिवडी, निवळी, शिरवली, सावर्डे, कादवड, गाणे, ओवळी, आकले व येगाव या १७ गावांमधील वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी सावर्डे, डेरवण, टेरव, कादवड, कोंडमळा, अडरे, अनारी, आगवे या गावांमध्ये सध्या टँकर धावत आहे. www.konkantoday.com