नदीच्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह सोडून मासेमारी करतानाचा मोह अंगाशी , विजेचा करंट लागून एकाचा मृत्यू-
*खेड (प्रतिनिधी)*गुहागर तालुक्यातील पिंपर येथे आज अतिशय धक्कादायक अशी घटना घडली. नदीच्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह सोडून मासेमारी करतानाचा मोह अंगाशी आला आणि त्याच्यात एकाचा दुर्दैवीरीत्या अंत झाला या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोक काळा पसरली असून सध्या गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत.पिंपर येथील मठवाडी मधील दोघेजण हे नदीवर मासेमारीसाठी गेले होते.यावेळी नदीतील मासे लवकरात लवकर पकडण्यासाठी नदी शेजारीअसणाऱ्या इलेक्ट्रिक पोलवर अनधिकृत पणे वायर टाकून विजेचा प्रवाहनदीतील पाण्यात सोडला याच वेळी या दोघांमधील संदेश दवंडे याव्यक्तीला पाण्यात करंट सोडल्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा स्पर्शझाल्याने तात्काळ विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाला तर दुसरामुकेश नामक व्यक्ती हा त्याला वाचवताना जखमी झाला. गावात ही घटनावाऱ्यासारखी पसरली असताना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या दोनव्यक्तींना चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेयावेळी संदेश दवंडे हा मयत झाला असून दुसऱ्या जखमी व्यक्तीवर सध्याउपचार सुरू आहेत. गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यामार्गदर्शनाखाली अमोल वांगणकर व गुहागर पोलीस संपूर्ण घटनेचातपास करत आहे.www.konkantoday.com