
चिपळूण न.प.च्या कामात लघु पाटबंधारे खात्याचा अडसर
_मिरजोळीसह शिरळ कोंढे गावांचा पाणीप्रश्न लक्षात घेता नगर परिषदेने मुरादपूर येथे कामासाठी घातलेला बांध गुरूवारपासून फोडण्याचे काम सुरू केले आहे. तर लघुपाटबंधारे विभागाने उक्ताड येथून बंद असलेल्या गाळ वाहतुकीला जाणुनबुजून सुरूवात करून अडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून या विभागाच्या अधिकार्यांना ग्रामस्थ जाब विचारण्यासाठी गेले असता ते गायब झाले. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पाणीप्रश्नासाठी कायम सहकार्य करण्याचे आश्वासन भेटीदरम्यान दिले. www.konkantoday.com




