घराचे पडवीत ठेवलेली दुचाकी चोरीला

रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी खुर्द येथे घराचे पडवीत ठेवलेली दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २० मार्च ते २ एप्रिल २०२४ दरम्यानच्या काळात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चोरून नेणार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ०८ एएस २४१८) ही घराच्या पडवीत उभी करून ठेवली होती. २० मार्च ते २ एप्रिल २०२४ दरम्यानच्या काळात ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button