खेड तालुक्यातील मौजे बोरज शिवफाटा येथे कारवाई करत पोलीसांनी 3 किलो गांजा पकडला
*खेड तालुक्यातील मौजे बोरज शिवफाटा येथे कारवाई करत पोलीसांनी 3 किलो गांजा पकडला*_______________________निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. खेड तालुक्यातील मौजे बोरज शिवफाटा येथे कारवाई करत पोलीसांनी 3 किलो 954 ग्रॅम गांजा पकडला आहे.आरोपींकडून वापरण्यात आलेले वाहन आणि तीन मोबाईलसह तिघांना अटक करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सक्त सूचना दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील बोरज शिवफाटा येथे अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करण्यात आली. पोलीसांनी असगाणी नवानगर येथून मोहन शिवशंकर कुशवाहा, वय 22, रा. खेर्डी, चिपळूण, शुभम संतोष गमरे, वय 23, रा. लोटे, घाणेखुंट, खेड आणि सचिन रामसहजीवन चौहान, वय 20, रा. असगाणी, नवानगर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 3 किलो 954 ग्रॅम वजनाचा गांजा आणि त्यासोबत एक वाहन आणि तीन मोबाईल असा 1 लाख 48 हजार 190 रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरिक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय जाधव, सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे, सुरज भोळे, घुगरे, पाचवे आणि बोरकर यांनी केली.www.konkantoday.com