
कोणत्याही राजकीय पक्षाने मतांसाठी गावात येवू नये, असे फलक ग्रामस्थांनी लावले
_खेड तालुक्यातील तळे-म्हसोबावाडी मार्गावर जाणारा रस्ता २०२२ परतीच्या पावसात पूर्णपणे खचून पुरती दैनावस्था झाली आहे. आजतागायत रस्त्याची दुरूस्तीच झालेली नाही. निवडणुकीपूर्वी या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देवूनही अद्याप रस्त्याची डागडुजी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय पक्षाने मतांसाठी गावात येवू नये, असे फलक ग्रामस्थांनी लावले असून मतदानावर बहिष्काराच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम राहिले आहेत.२०२३ मध्ये झोळीवाडी फाट्यापासून म्हसोबावाडीच्या रस्ता दुरूस्तीसाठी ६० लाख रुपये मंजूर झाल्याचा फलक लावण्यात आला होता. मारूती मंदिराजवळील फाट्यापासून म्हसोबावाडीतील रस्ता दुरूस्तीसाठी १५ लाखांचाा निधी मंजूर करण्यात आल्याचे म्हसोबावाडीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात झोळीवाडी फाट्यापासून म्हसोबावाडीच्या रस्त्यावर केवळ गटर कटिंग करून ५ मीटर रिटेनिंग भिंत करण्यात आली आहे. ज्या मार्गाच्या दुरूस्तीसाठी ६० लाखांच्या निधीची गरज होती त्या ठिकाणी केवळ १५ लाख रुपये खर्च होणार असून ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी ६० लाख रुपये खर्च झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. www.konkantoday.com