रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत १६ एप्रिलला अर्ज भरणार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची ही जागा नैसर्गिक न्यायतत्वावर भाजपची असल्याचा टोला सध्याच्या महायुतीच्या उमेदवार तिढ्यावरून उबाठा खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे. नारायण राणे हे हेवीवेटेड नेते आहेत, ते रणांगणात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करत आपण येत्या १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे राऊत यांनी रत्नागिरीत मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.रत्नागिरी-सिंंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात या निवडणुकीसाठी कोणीही येवो आपल्याला लढायचं आहे आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे. याच आत्मविश्वासाने आम्ही कामाला लागलो आहोत. त्यामुळे समोर कोण असेल या बाबत मी अजिबात चिंतेत नसल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत अडीच लाखांच्या मताधिक्याने आपला विजय होईल असे राऊत यांनी म्हटलं आहे.www.konkantoday.com