रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबांव येथे दोन दुचाकींची टक्कर, दोघे जखमी

रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबांव येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातामधील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला कोल्हापूर येथे उपचारासाटी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.अजिंक्य कृष्णा आखाडे (२६, रा. कुवारबाव, रत्नागिरी) व अभिजित पिलणकर अशी अपघातामधील जखमींची नावे आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button