रत्नागिरी तालुक्यातील पाली पाथरट येथे अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील पाली पाथरट येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयेश विष्णू गावडे (३३, रा. वेरळ, लांजा) असे मृताचे नाव आहे. जयेश याच्यावर मुंबईतील केईएम रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०२३ रोजी पाली पाथरट रस्त्याावर जयेश याची दुचाकी घसरून अपघात झाला होता. यामध्ये जयेश याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी प्रथम रत्नागिरी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र जयेश याला अधिक उपचारासाठी मुंबई येथील केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान जयेश याचा मृत्यू झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button