त्या नौका स्थानबद्ध ठेवण्याच्या रत्नागिरी मत्स्य विभागाला सूचना
_रत्नागिरीतील मच्छिमार नौकांनी पकडलेली कोट्यवधी रुपयांची मासळी मुंबईतील समुद्रात लुटण्यात आल्याच्या प्रकाराने येथील मच्छिमार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. मासळी आणि इतर यंत्रणा लुटली गेल्यानंतर त्या मासेमाीर नौका रत्नागिरीकडे परतल्या आहेत. पण त्या प्रकाराबाबत कोणतीही तक्रार पोलिसांकडे झालेली नसून मुंबई उपनगरच्या मत्स्य विभागाने संबंधित मच्छिमार नौकांना स्थानबद्ध ठेवण्याच्या सूचना रत्नागिरी मत्स्य विभागाला देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com