जिल्हा परिषद शाळा जांभरुण १ च्या विद्यार्थ्यांनी जांभरूण गावात असलेल्या कातळ शिल्पाना दिली भेट
क्षेत्रभेट कुठे घ्यावी याची चर्चा होत असतानाच जांभरुण गावच्या सीमेवर कातळ शिल्प असल्याची समजले. कातळ शिल्प ही एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहेत. या कातळ शिल्पांना खोद चित्र असेही म्हणतात.जगात विविध भागात मानवाने खोदलेली कातळ शिल्पे दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात जगात रॉक आर्ट म्हणून ही ओळखली जातात.अशी कातळ शिल्पे आहेत गोवा, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा कातळ शिल्पे आहेत. ही कातळ शिल्पे त्या काळात मानवाने का कोरलेली आहेत हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आपल्या भावभावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी कदाचित अशी चित्र त्या काळातील मानवाने कोरलेली असावीत. काही भौमितिक आकृत्या तर नवीन वैज्ञानिक युगाला सुद्धा मागे काढतील अशा आहेत, प्रमाणबद्ध आहेत. काही प्राणी मात्र जे कोरण्यात आलेले आहेत असे प्राणी पक्षी कोकणात आढळत नाहीत.डोक्यावर तर वेगळे गोलाकार आकार आहेत या कातळ शिल्पांचा कालावधी निश्चित नाही. ज्या ठिकाणी कातळ शिल्प कोरलेले आहेत त्या ठिकाणी आठ वजा विहीर खोदण्यात आलेले आहेत कारण माणूस वस्ती तर करत असेल तर त्यांना पाणी पिण्याची व्यवस्था या मानवाने विहिरीतून केली असावी. या विहिरीला पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्या केलेले आहेत. यांचा आकार पृष्ठभागाला आयताकृती आहेत एक वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना या आठ वजा विहिरींची आहे परंतु जांभरुण गावांमध्ये असणारी हा आर वजा विहीर याची लांबी रुंदी इतर आड किंवा विहिरींपेक्षा जास्त आहे. गावातील लोक या विहिरीला तळ असे संबोधतात. मे महिन्यात सुद्धा या विहिरीमध्ये पाणी असते. वेतोशी, नरबे व जांभरुण या तीन गावच्या सीमेवर कातळ शिल्प म्हणजेच खोद चित्र आहेत. निवळी, करबुडे, देऊड आणि जांभरुण या गावात सपाट कातळसड्यावर विविध आकृत्या जांभा दगडात कोरलेले आहेत. या ठिकाणी पक्षी प्राणी यांची चित्रे न समजणारे आहेत.विशेष म्हणजे या ठिकाणी नऊ मनुष्याकृती आहेत. त्यातील एक आकृती तर आठ फूट आहे व इतर आकृत्या ह्या पाच फुटाच्या दरम्यान आहेत. एकाच ठिकाणी एवढ्या मनुष्याकृती आहेत हे विशेष आहे. या मनुष्याकृती पुरुषांच्या आहेत अशा खुणा दिसतात. एकाच ठिकाणी पंचवीस ते तीस खोदशिल्प बहुतेक याच ठिकाणी असावीत.काही आकृत्या तर अनाकलनीय आहेत. या ठिकाणाला नक्कीच भेट द्या.या ठिकाणी पोहोचायचे असल्यास वाहन ठेवून किमान दीड तास चालत जावे लागते. या ठिकाणी आपल्या करबुडे वेतोशी मार्गे किंवा कोतवडे मार्गे आपण कातळशिल्पा पर्यंत पोहोचू शकता.कोकणात असणार्या या कातळ शिल्पांचे जतन संवर्धन व संशोधन होणे गरजेचे आहे. अनेक इतिहास संशोधक या कातळशिल्पावर अभ्यास करत आहेत.ङ्ग गावागावात असणारी अशी कातळ शिल्पे गावातील लोकांनी एकत्रित येऊन जपली पाहिजेत कोकणातील पर्यटन स्थळ आहेत. त्याच्या जोडीला कातळ शिल्प पाहण्यासाठी येऊ शकतात.पर्यटक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात त्यात जर कातळ शिल्पांची भर पडली तर पर्यटन मोठया जोमाने वाढेल यात शंका नाही.ही कातळ शिल्प दाखवण्यासाठी जांभरूण गावचे सरपंच श्री.गौतम सावंत यांची तसेच उपसरपंच श्री.मंदार थेराडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अजित सावंत,उपाध्यक्ष सौ. प्रांजल साळुंके यांचीही मदत मोलाची होती. मुख्याध्यापक श्री.राजेश पवार यांनी या कातळशिल्प क्षेत्रभेटीचे नियोजन व मार्गदर्शन केले. सहकारी शिक्षक श्री.राजू कोकणी, श्रीम. कोतवाल यांचे सहकार्यामुळे ही क्षेत्र भेट यशस्वी झाली.सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांनीच त्यांनी ही कातळशिल्पे संरक्षित करणे ही काळाची गरज आहे आणि ती संरक्षित केली जातील यामुळे जांभरुण गाव पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित झाल्यास गावाच्या विकासाला मदत होवू शकते असे आश्वासन देत,विश्वासही व्यक्त केला. निवळी – करबुडे – देऊड – जांभरुण – पुढे समुद्राकडे जाणार हा मार्ग असावा आणि मार्ग ही कातळ शिल्प दिशादर्शक तर नसतील ना? असा प्रश्न उपस्थितीत सर्वांना पडला. www.konkantoday.com