
चिपळूण शहरातील अंतर्गत रस्त्याचे खड्डे भरतेवेळी डांबर वितळवणार्या गाडीला आग
चिपळूण शहरातील अंतर्गत रस्त्याचे खड्डे भरतेवेळी नगर परिषदेच्या डांबर वितळवणार्या गाडीला आग लागल्याची घटना मंगळवारी सायं. ४ च्या सुमारास शहरातील विरेश्वर तलाव परिसरातील मार्गावर घडली. भडकलेली आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचार्यांची तारांबळ उडाली. अखेर आगीच्या झोतावर बारीक खडी टाकून त्यावर नियंत्रण आणण्यात आले. यावेळी अग्निजमन बंबााला पाचारण करण्यात आले होते.शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे नगर परिषदेकडून भरले जात आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाकडून येणार्या मागांवरील खड्डे भरण्याचे काम मंगळवारी सुरू असताना डांबर वितवळणार्या गाडीत डांबर ओतण्यात आले होते. तसेच या गाडीत खालील बाजूने लाकडे टाकून ती पेटवण्यात आली असताना काही वेळानंतर आगीचा भडका उडून साडीने अचानकपणे पेट घेण्यास सुरूवात केली. एकीकडे खड्डे भरण्याचे काम सुरू असताना हा प्रकार कर्मचार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला. www.konkantoday.com