चिपळूण तालुक्यातील निवळी-चौसुपीवाडीत राहणार्‍या एका ३६ वर्षीय तरूणाची आत्महत्या

चिपळूण तालुक्यातील निवळी-चौसुपीवाडीत राहणार्‍या एका ३६ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. आत्महत्येचे कारण पुढे आले नसून या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप श्रीराम सुर्वे (३६, रा. निवळी-चौसुपीवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. संदीप याने राहत्या घराच्या भालाला नायलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याला उपचारासाठी डेरवण रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले. दरम्यान, संदीप याच्या आत्महत्येचे कारण पुढे आलेले नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button