
चिपळुणात रमेश कदमांच्या निवासस्थानी सुनील तटकरे यांनी भेट दिली
महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचारात उतरलेले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रकृतीच्या चौकशीनिमित्ताने रायगडमधील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी जयेश निवासस्थानी भेट दिली. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतानाच तटकरे यांनी कदम यांच्या भेटीसाठी साधलेल्या या अचूक टायमिंगची चर्चा मात्र राजकीय गोटात सुरू झाली आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराची चिपळूण तालुक्यातील जबाबदारी माजी आमदार कदम सध्या सांभाळत आहेत. याच तालुक्यातील ७२ गावे ही तटकरेंच्या रायगड मतदार संाात समाविष्ठ आहेत. तसे पाहिले तर कदम यांच्यावर दीड महिन्यापूर्वी लहानशी शस्त्रक्रिया झाली. थोडाकाळ विश्रांतीनंतर कदम हे राजकारणात सक्रीय झाले. एवढेच नव्हे तर सध्या निवडणूक प्रचारातही उतरले आहेत. मंगळवारी तटकरे हे चिपळूण दौर्यावर होते. सावर्डेतील बैठकीनंतर तटकरे यांनी माजी आमदार कदम यांना संपर्क करून घरी भेटण्यास येत असल्याचे सांगितले. यावेळी कदम हे कान्हे येथे प्रचार बैठकीत होते. तटकरेंच्या संपर्कानंतर तेही बैठक सोडून निवासस्थानी परतले.मंगळवारी ५ च्या सुमारास तटकरे हे काही निवडक पदाधिकार्यांबरोबर कदम यांच्या जयेश निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर अर्धा तास दोघांनीही गुप्तपणे चर्चा केली. www.konkantoday.com