चंद्र दर्शनावर आधारित रमजान ईद ची सुट्टी रत्नागिरी, दि. 5 (जिमाका): रमजान ईद” सण चंद्र दर्शनावर आधारित असल्याने मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना ज्या दिवशी ईद असेल ( दिनांक १० एप्रिल २०२४ किंवा दिनांक ११ एप्रिल २०२४ यापैकी एक दिवस) त्या दिवशी रमजान ईद” ची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एम कासार यांनी आज गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे,शेक्षणिक वर्ष सन २०२३-२४ करिता जिल्ह्यातील मराठी, उर्दू व खासगी प्राथमिक शाळांच्या किरकोळ व मोठ्या सुट्यांबावत परिपत्रक प्रसिध्द करण्यात आलेले आहे. या परिपत्रकाप्रमाणे मराठी शाळांकरिता “रमजान ईद” या सणाची दिनांक ९ एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, दिनदर्शिकेमध्ये व शासनाच्या सुट्टीच्या परिपत्रकामध्ये “रमजान ईंद” ची सुट्टी दिनांक ११ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, “रमजान ईद” सण चंद्र दर्शनावर आधारित असल्याने मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना ज्या दिवशी ईद असेल ( दिनांक १० एप्रिल २०२४ किंवा दिनांक ११ एप्रिल २०२४ यापैकी एक दिवस) त्या दिवशी रमजान ईद” ची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी वार्षिक मर्यादेपेक्षा जास्त होत असल्याने हा सुट्टीचा दिवस रविवार दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांनी नियमित वेळेत शाळा सुरु ठेवून भरुन काढावी. सुट्टीबाबत आपले अधिनस्त सर्व मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना कळविण्यात यावे. तसेच दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी शाळा सुरु ठेवून दिवस भरुन काढलेचा अहवाल सादर करावा.