
खेड नगर परिषदेची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बॅनर लावणार्यांवर कारवाई
खेड नगर परिषदेची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणार्यांना नगर प्रशासनाने दणका दिला. सर्व बॅनर ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान चोख पोललीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. शहरातील गांधीचौक, सोनारआळी, तीनबत्तीनाका, ब्राह्मणआळी, कुवारसाई, दापोलीनाका, नाना-नानी पार्क आदी ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बॅनर लावण्यात आले होते. नगर प्रशासनाने सर्व बॅनर ताब्यात घेत कारवाईचा बडगा उगारला. नगर प्रशासनाच्या कारवाईबाबत सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. www.konkantoday.com