
खेड एसटी आगारानजिक पुन्हा आग लागल्याचा प्रकार
खेड शहरातील गुलमोहर पार्क परिसरातील डॉ. रहिम हॉस्पिटलच्या मागील एसटी आगाराच्या आवारात मंगळवारी पहाटे ४ च्या सुमारास पुन्हा आग लागल्याने खळबळ उडाली. साखरझोपेतील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या केंद्रास कळवल्यानंतर अवघ्या तासाभरात आग नियंत्रणात आणल्याने मोठा धोका टळला.२० दिवसांपूर्वीच एसटी आगारानजिक कचरा गोळा करून जाळत असताना आगीचा भडका उडाला होता. नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रातील कर्मचार्यांनी तासाभरातच आग आटोक्यात आणण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त करून ठेवलेली वाहने बचावली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा मंगळवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीने सार्यांची त्रेधातिरपीट उडाली. www.konkantoday.com