
क्रेडीट कार्डचे ॲन्युअल चार्जेस फ्री करण्याचे सांगत १ लाख ६ हजार ३८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी:- क्रेडीट कार्डचे ॲन्युअल चार्जेस फ्री करण्याचे सांगून १ लाख ६ हजार ३८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० मार्चला रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास कुवारबाव येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे घरी असताना एका संशयित अज्ञात महिलेने त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ए. यु स्मॉल फायनान्स बॅकेंतून बोलत असून तुमच्या क्रेडीट कार्डचे ॲन्युअल चार्जेस फ्री करण्यासाठी कार्डचे डिटेल्स हवे असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या व्हॉटसअपवर लिंक पाठविली. त्या लिंकवर फिर्यादी यांनी क्रिडीट कार्डचे डिटेल्स भरले त्यानंतर काहि अवधीत त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन ९२ हजार ६५५ रुपये व १३ हजार ३८३ रुपये असे खर्च करुन एकूण १ लाख ६ हजार ३८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com