किरण सामंत हे खूप सरळ आणि साधेपणा अंगीकारलेला माणूस ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत-आमदार नितेश राणे
सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत.किरणजी सामंत, आणि मंत्री उदयजी सामंत हे केद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना वडिलांप्रमाणे मानतात. मानसन्मान देतात. राजकीय सल्ले घेतात. अशावेळी उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री राणे साहेब यांच्यात भेट झाली तर ती कौटुंबिक भेट असते.
अधिकार वाणीने घेतलेली भेट असते. अशा व्यक्तीला राजकीय चष्म्यातून पाहू नये. जसे निलेश आणि नितेश आहेत तसेच राणे साहेबांसाठी किरण जी आणि उदय जी आहेत. त्यामुळे मंत्री उदयजी सामंत यांची भेट ही अधिकार वाणीने घेतलेली कौटुंबिक भेट होती.
असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले. किरण सामंत हे खूप सरळ आणि साधेपणा अंगीकारलेला माणूस आहे. ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेऊन जशी केंद्रीय मंत्री राणे साहेबांची त्यांना साथ आहे.
www.konkantoday.com