
आता खवय्यांना थेट पोस्ट कार्यालयातून मिळणार अस्सल सेंद्रीय हापूस आंबा
मार्च महिना सुरू झाला की खवय्यांना आंब्याचे वेध लागतात. त्यातच कोकणातील हापूसची चव सर्वात वेगळी. यामुळे देशात नाही तर विदेशातही हापूस आंब्यांना मागणी असते. परंतु बाजारात मिळत असणारा हापूस आंबा अस्सल आहे का? अशी शंका नेहमीच उपस्थित केली जाते. आता भारतीय डाक विभागाने घरपोच हापूस आंबे सेवा सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना अस्सल सेंद्रीय हापूस आंबे घरपोच मिळणार आहेत. भारतीय पोस्ट विभागाने उत्पादक ते ग्राहक अशी ही सेवा सुरू केली आहे. त्यात देवगडचा अस्सल हापूस मिळणार आहे.
www.konkantoday.com