
डोंबिवलीत केमिकल्स कंपनीतील स्फोटाची संपूर्ण चौकशी होणार-उद्योग मंत्री उदय सामंत
ठाणेच्या डोंबिवलीत केमिकल्स कंपनीतील स्फोटानंतर कामगार विभागाकडून या कंपनीबाबत मोठी माहिती समोर आली. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत बॉयलरसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती.कंपनीतील बॉयलर अनधिकृत होता. या स्फोटाची संपूर्ण चौकशी होणार, असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.डोंबिवली येथील एमआयडीसीतील अनुदान केमिकल कंपनीत गुरूवारी दुपारी मोठा स्फोट झाला. एका पाठोपाठ एक, तीन मोठे स्फोट झाले. या स्फोटानंतर कंपनीत आग वेगाने पसरली. या आगीत कंपनीतील 8 पेक्षा जास्त कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 50 कामगार जखमी झाले आहे. या स्फोटांची तीव्रता एवढी होती की, चार किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज गेले. आजूबाजूच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंतच्या इमारतींना हादरे बसलेwww.konkantoday.com