
फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी व तबलावादक अथर्व आठल्येचा सत्कार
फाटक हायस्कूल उज्ज्वल यशाबरोबर जबाबदारीची जाणीव अतिशय महत्त्वाची आहे. गुरूंचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांची साथ यामुळेच आपण उज्ज्वल यश संपादन करू शकलो असे प्रतिपादन फाटक हायस्कूलचा माजी विद्यार्थी अथर्व आठल्ये यांने केले.
देशात तबला अलंकार परीक्षेत प्रथम आल्याबद्दल फाटक हायस्कूलमध्ये अथर्व आठल्ये याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्काराला उत्तर देताना त्याने आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा ऍड. सुमिता भावे, प्रमुख पाहणे प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, होते. सीईओ दाक्षायणी बोपर्डीकर उपस्थित रत्नागिरीतील प्रथितयश तबलावादक हेरंब जोगळेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नूतन संगीत कक्षाचे उदघाटन सत्कारमूर्तीच्या हस्ते पार पडले. पाहुण्यांचा परिचय पद्मश्री आठल्ये यांनी करुन दिला. संगीत वर्गातील विद्यार्थ्यांच्या गायनाने आणि अथर्व आठल्ये याच्या मंत्रमुग्ध करणार्या तबलावादनाने भातखंडे – पलुस्कर स्मृती संगीत सभा झाली. सूत्रसंचालन विजय गावडे यांनी तर नेहा शेट्ये यांनी आभार मानले.www.konkantoday.com




