निवडणुकीच्या कामावरून दिव्यांग कर्मचार्यांची निवडणूक अधिकार्यांकडे धाव
दिव्यांग कर्मचारी तसेच स्तनदा माता गरोदर स्त्रिया आणि तत्सम कर्मचार्यांना या निवडणूक कामात सामावून न घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. मात्र असे असतानाही जिल्ह्यातील ३५० हून अधिक दिव्यांग कर्मचार्यांना याा कामी घेतल्याबाबत महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिले आहे.निवडणुकीच्या धामधूमीत आता जिल्ह्यातील सर्वच विभागातील कर्मचार्यांना निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणूक कामात सामावून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचार्यांची माहिती मागवली होती. आलेल्या माहितीनुसार अनेकांन निवडणुकीच्या विविध जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३५० हून अधिक अपंग कर्मचार्यांनाही या निवडणुकीची जबाबदारी देण्याात आली आहे. www.konkantoday.com