चिपळूण शहरात दोन वेळा भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण मोहीम राबवूनही श्वानांची संख्या वाढतेय
चिपळूण शहरात दोन वेळा भटक्या श्वानांची निर्बिजीकरण मोहीम राबहूनही त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती या श्वानांच्याा झुंडी दिसून येत आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने चिपळूण नगर पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. त्यानुसार कोल्हापूर येथील सोसायटी फॉर अनिमल प्रोटेक्शन या संस्थेतर्फे शहरात पुन्हा भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण व ऍन्टी रेबीज लसीकरण केले जात आहे. मार्च महिना अखेर हाती घेतलेल्या या मोहिमेत रविवारपर्यंत तब्बल १२७ श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे. www.konkantoday.com