उन्हाळी सुट्टीत येणार्या पर्यटकांकडून वंदे भारत एक्स्प्रेसला मोठी पसंती
कोकण मार्गावरून धावणारी सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास महागडा असूनही दिवसागणिक कोकणवासियांसह पर्यटकांची पसंती वाढत आहे. उन्हाळी सुट्टीतील वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेर्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. ३ जूनच्या एक्स्प्रेसच्या फेर्या प्रतीक्षा यादीत गेल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कन्फर्म तिकिट मिळणे अवघड झाल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे. गणेशोत्सव, दीपावली, शिमगोत्सवापाठोपाठ उन्हाळी सुट्टीतील फेरर्याही हाऊसफुल्ल झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत भर पडली आहे.२८ जूनपासून कोकण मार्गावर धावणार्या आलिशान वंदे भारत एक्स्प्रेसला कोकणवासियांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या महागड्या प्रवासामुळे एक्सप्रेसमधून प्रवास करणार कोण, असे हिणवत अनेक प्रवाशांनी नाके मुरडली होती. मात्र महागडा प्रवास असूनही चाकरमान्यांसह कोकणवासियांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या फेर्यांना आजवर उदंड प्रतिसाद दिला आहे. www.konkantoday.com