शासनाने जाहीर केलेल्या नवीन नगरांच्या अधिसूचनेनंतर जिल्ह्यात जमिनींच्या व्यवहाराला वेग
नुकताच राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन नगरांच्या अधिसूचनेनंतर आता कोकणात सर्वत्रच जमिनीच्या खरेदी-विक्रीला वेग आला आहे. जिल्ह्यात होवू घातलेल्या या ४ नवीन नगरांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र राज्यय रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. मात्र संबंधित १०५ गावांचे नवीन नगर झाल्यास या नगरांमधील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नक्की काय फरक पडेल याबाबत स्थानिकांच्या मनात साशंकता व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील ३ महिन्यात जमिनींचे व्यवहार पूर्ण करण्याची लगबग आता वाढल्याची चर्चा सुरू आहे.कोकण दृतगती आणि समुद्रकिनारी महामार्गालगतच्या १३ ग्रोथ संेंटरच्या क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना विभागाकडून नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.www.konkantoday.com