रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार, एक्स या सोशल मीडिया वरून केली पोस्ट
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतली आहे त्यांनी काल मध्यरात्री एक्स या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट प्रदर्शित केली आहे .माननीय नरेंद्र मोदी जी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व आपकी 400 होण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार- किरण सामंत असे
स्वतः किरण सामंत यांनी केलेल्या पोस्टमुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजप जागा लढविणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे ही जागा केंद्रीय मंत्री नारायण राणे लढवतील हे स्पष्ट झाले आहे .गेले काही दिवस या जागेबाबत वाद सुरू होता स्वतः किरण सामंत या मतदारसंघातून इच्छुक होते परंतु भारतीय जनता पक्षाने ही जागा मिळावी यासाठी सर्वस्व पणाला लावले होते शेवटी ही जागा मिळवण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाले आहे असे असले तरी किरण सामंत समर्थक मात्र या निर्णयामुळे नाराज झाले आहेत त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत व भाजपकडून नारायण राणे अशी लढत पाहायला मिळेल असा अंदाज आहे मात्र भाजपने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही
www.konkantoday.com