यावर्षी उत्तम पीक येवूनही गुहागरात सुपारीचे दर घसरले अतिवृष्टी,

अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीचा सातत्याने साामना करूनही गुहागर तालुक्यात सुपारी पीक यावर्षी भरघोस आले आहे. मात्र बाहेरून येणार्‍या सुपारीमुळे गेल्यावर्षीच्य तुलनेत सुपारीच्या दरात घसरण झालेली असल्याने मोठा आर्थिक फटका गुहागरच्या सुपारीला बसला असल्याची खंत बागायतदारांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे राज्याच्या फळबाग लागवड योजनेत सुपारी पिकाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.गुहागर तालुका सुपारी पिकासाठी प्रसिद्ध आहे. गुहागर तालुका सुपारी पिकासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील पालशेत, वडद, गिमवी व काळसूरकौंढर, गुहागर ही गावे ओळखली जातात. येथील बागायतदारांचे हमखास उत्पन्नाचे साधन म्हणून सुपारी पिकाकडे पाहिले जाते. गुहागर तालुक्यातील एकट्या पालशेतमध्ये दरवर्षी सुपारीचे पीक ७० ते ८० टन होते. त्यापाठोपाठ वडद व गुहागरचा नंबर लागतो. यावर्षी गुहागर तालुक्यात पालशेत व वडदमध्ये सुपारीचे पीक मोठ्याा प्रमाणात आले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button