
मिर्या-नागपूर महामार्गासाठी काही ठिकाणी वाढीव भूसंपादन होणार
मिर्या-नागपूर महामार्गाच्या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. आता या महामार्गासाठी काही गावांमध्ये पुन्हा अधिकच्या भूसंपादनासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील काही गावांमधील ७ पूर्णांक ८ हजार ३२१ हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे.आता रत्नागिरी तालुक्यातील खेडशी, पाली, खानू, नाणीज, झाडगाव, नाचणे व संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव, साखरपा, जंगलवाडी आणि गरंजारी या गावातील काही ठिकाणचे वाढीव भूसंपादन करण्यात येणार आहे. मिर्या-नागपूर महामार्ग १६६ च्या कामाला आता रत्नागिरीमध्ये वेग आला आहे. या महामार्गासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील २८ गावांमधील १५९ हेक्टर इतके क्षेत्र संपादित करणे अपेक्षित आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १३ आणि संगमेश्वर तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.www.konkantoday.com