ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 4 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा
__शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 4 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा केली आहे.यात कल्याण, हातकणंगले, पालघर, जळगाव या जागांचा समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. यासोबतच हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कांबळी आणि जळगावमधून करण पवार यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.महाविकास आघाडीत शिवसेनेच्य वाट्याला 22 जागा आल्या आहेत. त्यातील 17 उमेदवारांची यादी यापूर्वीच ठाकगे गटाने जाहीर केली आहे. त्यानंतर आज 4 जागांवरी उमेदवारांची देखील घोषणा करण्यात आली. उर्वरित एक जागा मुंबई उत्तर ही आहे आणि त्या जागेसाठी मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू आहे. चर्चेनंतर ती जागा मित्रपक्ष लढेल किंवा आम्ही तेथील उमेदवार जाहीर करू असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.www.konkantoday.com