चिपळूण शहरातील मार्कंडी भागात असलेल्या नगर परिषदेची अग्निशमनची इमारत झाली मोकळी
चिपळूण शहरातील मार्कंडी भागात असलेल्या नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्र इमारतीत ठेकेदाराने ठेवलेले साहित्य प्रशसनाने उचलायला लावले आहे. त्यामुळे ही इमारत मोकळी झाली आहे. पुन्हा शासकीय इमारतीचा बेकायदा वापर न करण्याच्या सूचनाही या ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.काही वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून ही इमारत उभारली आहे. मात्र २०२१ साली आलेल्या महापुरात ती बुडुन नगर परिषदेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अग्निशमन विभागाचा कारभार बुरूमतळी या सुरक्षितस्थळी नेला आहे. त्यामुळे इमारत मोकळीच आहे. त्याचा फायदा ठेकेदाराने उचलला. येथे खासगी वाहने पार्किंग करण्यासह सिमेंट व अन्य साहित्य येथे ठेवले होते. www.konkantoday.com