गंगेचे आगमन झाल्याने भाविकांची पावले गंगातीर्थ क्षेत्री वळली
राजापूर शहरानजीकच्या गंगातीर्थ क्षेत्री गंगेचे आगमन झाले आहे. ऐन उन्हाळ्यातच गंगेचे आगमन झाल्याने भाविकांची पावले गंगातीर्थ क्षेत्री वळली आहेत.सध्या शिमगोत्सवानिमित्त मुंबईकर गावी आले आहेत. त्यामुळे सुटीसाठी गावी आलेले मुंबईकर गंगातीर्थाला भेट देत असल्याने गर्दी वाढली आहे.www.konkantoday.com