
सर्वसामान्य माणसावर या वीज दरवाढीचा कुठलाही परिणाम होणार नाही-ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस
_लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात वीज दरवाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. परंतु सर्वसामान्य माणसावर या वीज दरवाढीचा कुठलाही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने रचना केल्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.एमईआरसीने जो काही निर्णय दिला आहे, त्यानुसार ही दरवाढ आहे. छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बोजा पडणार नाही, अशा पद्धतीची त्याची रचना करण्यात आलेली आहे. www.konkantoday.com