शिमगा सण आटपून अनेक चाकरमानी पुन्हा परतीच्या दिशेने
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या शिमगोत्सवासाठी बहुसंख्येने चाकरमानी काही दिवसांपूर्वीच गावच्या दिशेने दाखल झाले होते. पालखीतून आलेल्या ग्रामदेवतेचे स्वागत मनोभावे पूजा, आरती यासह पारंपारिक कार्यक्रम आदींची सांगता झाल्यानंतर दाखल झालेल्या चाकरमानी पुन्हा परतीच्या दिशेने निघाला आहे. रविवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात परतीच्या प्रवासासाठी झालेली गर्दी लक्षात घेता हे बसस्थानक चाकरमानी प्रवाशांनी फुलून गेल्याचे चित्र होते. दरम्यान या प्रवाशांसाठी आगारातून जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.वर्षभर लक्ष लागून राहिलेला कोकणाती शिमगोत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाल्यानंतर सर्वत्र त्याची धामधूम सुरू झाली होती. प्रत्येक गावागावात शिमगोत्सवाचे वेगळेपण असून याचे वैशिष्ट्य सर्वदूर पोहचले आहे. वाडीवस्ती ढोल-ताशांच्या गजरात येणार्या ग्रामदेवतांच्या पालख्या, मनोभावे पूजा, आरती, ग्रामदैवतांची पालखी भेट सोहळा यासह पारंपारिक कार्यक्रम ही शिमगोत्सवाची विशेष ओळख, होळी सणावेळी तर त्यापूर्वी तालुक्यात खर्या अर्थाने शिमगोत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाला होता. यानिमित्ताने मुंबई, पुण्यातील बहुसंख्य चाकरमानी गावच्या दिशेने दाखल झाला होता.www.konkantoday.com