
रेल्वेतून पडून मिरज येथील एका ६१ वर्षीय इसमाचा मृत्यु
_कोकण रेल्वेने प्रवास करीत असताना तालुक्यातील राजापूर रोड रेल्वेस्टेशन हसोळ लाडवाडी दरम्यान रेल्वेतून पडून मिरज येथील एका ६१ वर्षीय इसमाचा मृत्यु झाला आहे.शनिवार ३० मार्च रोजी ६ वाजण्याच्या दरम््यान हा अपघात झाला.चंद्रकांत सदाशिव काटकर असे या इसमाचे नाव असून तो बुधगाव, राजवाडा तालुका मिरज जि. सांगली येथील रहिवासी आहे.सदर इसमाचा रेल्वे ट्रकरवर मृतदेह आढळून आल्यानंतर या बाबतची खबर रेल्वेप्रशासनामार्फत राजापूर पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.www.konkantoday.com