महामार्गावरील पेव्हर ब्लॉक म्हणजे मृत्यूला आमंत्रणच -शौकत मुकादम यांचा आरोप

चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर रावतळे येथे सध्या पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. सर्व्हिस रोडला जोडून रस्त्याच्या रूंदीकरणासाठी हे काम केले जात असून हे पावसाळ्यात मृत्यूला आमंत्रणच ठरणार आहे. या विरोधी आवाज उठविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.मुंबई-गोवा महामार्गावर बहाद्दूरशेख ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार होता परंतु गर्डर चढवताना हा पूल बहाद्दूर शेख येथे कोसळला असल्याने त्याचे काम सध्या बंद आहे. परंतु याबाबत कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. महामार्गाच्या कामाबाबत कोणाला काहीही देणेघेणे नाही. येथे एकच अधिकारी असून ते रत्नागिरीत असतात. त्यांच्याकडे चार ठिकाणचा पदभार आहे. महामार्गाच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत. येथे एकेरी मार्ग अस्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button