
पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून मोटरसायकलवरून पसार झालेले चोरटे अखेर लांजा पोलिसांच्या ताब्यात
*_लांजा : पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून मोटरसायकलवरून पसार झालेले चोरटे अखेर लांजा पोलिसांच्या ताब्यात आले असून पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. ही घटना शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर भांबेड पवारवाडी येथे घडली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता चंद्रकांत कोकाटे (५३ वर्षे, रा.भांबेड वळणवाडी) ही महिला १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या मुलीची सासू शारदा बाळकृष्ण बागवे यांच्याकडे वाटूळ ते दाभोळे जाणाऱ्या रस्त्याने चालत असताना भांबेड पवारवाडी येथे जयराम पवार यांच्या घरासमोर काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघाजणांनी पैकी एका इसमाने नम्रता कोकाटे याच्या पाठीमागून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून नेले होते. त्यानंतर हे चोरटे मोटरसायकलवरून भांबेडमार्गे पळून गेले होते.या घटनेतील चोरटे अब्दुल मौला मुल्ला (२० वर्षे) आणि निखिल रानू बागडी (२० वर्षे, रा. धनगरगल्ली गणेशनगर, रुकडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) अशी या दोघा चोरट्यांची नावे असून कोल्हापूर पोलिसांनी या दोघांना चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. लांजा पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार तपासाठी या दोन्ही आरोपींना शनिवारी ३० मार्च रोजी लांजा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले होते. लांजा पोलिसांनी केलेल्या तपासात या दोन्ही आरोपींनी भांबेड येथील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा कबूल केला. त्यांनतर त्यांना लांजा न्यायासमोर उभे केले असता लांजा न्यायालयाने शनिवारी २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.www.konkantoday.com