चिपळूण शहरातील मुख्य जलवाहिनीच्या गळतीचे प्रकार सुरूच
खेर्डी-माळेवाडी येथून आलेल्या व खेंड येथील साठवण टाकीत जाणार्या नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला शनिवारी सायंकाळपासून पुन्हा गळती लागली आहे. गेल्या महिनाभरातील हा तिसरा प्रकार आहे. यामुळे पाणी वाया जात असून १ एप्रिलपासून या जलवाहिनीच्या दुरूस्ती कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने खेर्डी-माळेवाडी व गोवळकोट येथे जॅकवेल बांधल्या आहेत. या दोन्ही जॅकवेल अर्ध्या-अर्ध्या शहराची तहान भागवतात. यातील खेर्डी जॅकवेलमधून नियमित व चांगला पाणीपुरवठा होतो. तर गोवळकोट येथील जॅकवेलजवळ अनेकदा खाडीचे भरतीचे पाणी येत असल्याने नागरिकांना खारट व मचूळ पाणी मिळते असे असले तरी खेर्डी येथून शहराला आलेल्या मुख्य जलवाहिनीला कायमच ठिकठिकाणी गळती लागत असल्याचे दिसून येते. याचा नागरिकांच्या पाणीपुरवठ्याावर तितकासा परिणाम होत नसला तरी हजारो लिटर पाणी वाया जाते. www.konkantoday.com