चिपळूण नगरपालिकेचा अभिनव उपक्रम, नियमित कर भरणार्यांचा होणार सन्मान
मुदतीत व नियमित कर भरणार्यांचा प्रशासन प्रसस्तीपत्रके देवून सन्मान करणार आहे. कर वाढीचा टक्का वाढविण्यासाठी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी ही नवी संकल्पना आणली आहे. सध्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालमत्तांना सील करण्याची धडक कारवाई सुरू झाल्याने त्याचा चांगला परिणाम होत आहे. कारवाई करण्यास पथके जाताच कराची रक्कम भरली जात आहे. यातूनच दोन दिवसात सुमारे ५० लाख रुपये वसुली झाली असून आतापर्यंत १३ कोटी रुपये जमा झाले आहेत. १ एप्रिलपासून थकबाकीदारांना वार्षिक २४ टक्के दंड होणार आहे.www.konkantoday.com